बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत चालली असून आज पुन्हा नवे ७४ रुग्ण कोरोनाबाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर जिल्ह्यात आज तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ५९२ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत.
आजच्या नव्या ३ मृतांच्या आकडेवारीसह जिल्ह्यातील एकूण कोरोनामृताची संख्या ३५० इतकी झाली आहे. आज मृत्यू ओढवलेल्या ६४, ३५ आणि ४० या वयोगटातील तीन रुग्णांमध्ये ताप, सर्दी, श्वसनाचा त्रास अशी लक्षणे दिसून आली आहेत. तर आज ४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एप्रिल महिन्यातील एकूण रुग्णांचा आकडा ६४५ वर पोहोचला आहे.
आज नोंद झालेल्या ७४ रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील ५०, बैलहोंगल ५, चिकोडी ६, गोकाक ७, हुक्केरी १, रायबाग १, सवदत्ती १ आणि इतर ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे जाळे हळूहळू फोफावत चालले असून कोविद पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे यासह सावधगिरीच्या उपाययोजनांसह सर्व खबरदारी बाळगावी असे आवाहन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.