2 मे रोजी शहरातील आर पी डी कॉलेज मध्ये होणाऱ्या बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीची मतमोजणी दरम्यान कोविड नियमांचे तंतोतंत पालन केले जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ हरिशकुमार यांनी दिली आहे.
रविवारी सकाळी 8 वाजता वोटिंग मशीन आणि बॅलेटची मतमोजणी सुरू होणार असून यासाठी सर्व तयारी केलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले एजंट आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत सकाळी 7 वाजता स्ट्रॉंग रूम उघडला जाईल हेरेकर बिल्डींगच्या 40 नंबर सभागृहात सकाळी 8 वाजता बॅलेटची व ई पी बी एस मतमोजणी सुरू होईल.कोविड नियमानुसार एक हॉल मध्ये केवळ 2 टेबल असणार आहेत हॉल क्रमांक 17 आणि 16 मध्ये पोस्टल ई पो बी एस ची मतमोजणी होईल.
मोबाईल नेण्यास बंदी
2 मे रोजी बेळगाव पोट निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरास बंदी घालण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ हरीशकुमार यांनी बजावला आहे. मतमोजणी करणारे अधिकारी कर्मचारी आणि एजंट यांना देखील मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरास बंदी घालण्यात आली आहे.निवडणूक आयोगाकडून अधिकृत प्रवेशपत्र मिळवलेल्या पत्रकारांना मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरास परवानगी देण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्रात कोविड नियमावलीचे पालन करण्यात येणार असून कोविड नोडल अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ.एस. व्हि. मुण्याळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मतमोजणी केंद्रात उपचार केंद्र देखील स्थापन करण्यात आले आहे.मतमोजणी कर्मचाऱ्यांना सॅ नी टाय झर ,फेस मास्क,ग्लास शिल्ड आदी दिले जाणार आहे.एन आय सी च्या सहकार्याने विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या स्क्रीनवर प्रतेक फेरीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
मतमोजणी कर्मचाऱ्यांना मोफत उपाहार देण्यासाठी काऊंटर उघडण्यात आला आहे.दोन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.सकाळी सहा ते दुपारी साडे बारा वाजेपर्यंत पहिली शिफ्ट असणारा आहे.मतमोजणी केंद्राला तीन पदरी सुरक्षा देण्यात येणार आहे.450 कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.
त्या दिवशी जनता कर्फ्यु असल्याने पोलिसांनी दिलेल्या मार्गावरून उमेदवारांचे प्रतिनिधी,मतमोजणी कर्मचारी,
यांनी मतमोजणी केंद्राकडे यायचे आहे.सोबत त्यांना देण्यात आलेले परवानगी पत्र,ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. कोरोना संक्रमण वाढत असल्याने विजयोत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.निवडून आलेल्या उमेदवाराला प्रमाणपत्र स्वीकारताना आपल्या सोबत दोन व्यक्तींना नेण्याची परवानगी आहे.