Monday, November 18, 2024

/

ऑटोरिक्षा चालक व मालकांची शुभम शेळके यांना आर्थिक मदत

 belgaum

बेळगाव शहरातील टिळक चौक येथील ऑटोरिक्षा चालक व मालक संघटनेतर्फे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त करून 15 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली.

शहरातील टिळक चौक येथील ऑटोरिक्षा चालक व मालक संघटनेतर्फे काल मंगळवारी सायंकाळी चौकांमध्ये संघटनेचे अध्यक्ष राजू मोरे यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत पुष्पहार घालून उस्फुर्त स्वागत करण्यात आले. तसेच शुभम शेळके आणि राजू मोरे यांच्या हस्ते शिवम पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी शेळके यांना आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. त्याचप्रमाणे निवडणूक खर्चासाठी त्यांच्याकडे 15 हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.Auto riksha mode

याप्रसंगी राजू टुडे कर प्रकाश राऊत विनायक जाधव दशरथ गवळी आदींसह ऑटो रिक्षा चालक व मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य काय आणि टिळक चौक परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

लॉक डाऊनच्या संकटानंतर अलीकडच्या काळात ऑटोरिक्षा चालक व मालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही परिस्थिती असताना देखील टिळक चौक येथील ऑटोरिक्षा चालक व मालकांनी स्वयंस्फूर्तीने शुभम शेळके यांना 15 हजार रुपयांची आर्थिक मदत केल्याबद्दल नागरिकात प्रशंसोद्गार काढले जात आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.