कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारपेठेत नाईट कर्फ्यू आणि विकेंड लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर निवडक दिवसांसाठी भाजी विक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
विकेंड लॉकडाऊनचा आदेश २० एप्रिल रोजी जारी करण्यात आला असून या अनुषंगाने प्रत्येक शनिवारी आणि रविवारी भाजी विक्री बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी दिली आहे.
राज्यात कोरोना संक्रमितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. २० एप्रिल रोजी सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार कोविड नियम आणि मार्गसूचीला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी दिली आहे.