बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून शनिवार, १७ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत २,५६६ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १७ रोजी मतदान होत असून, पोलिस खात्याने याची सर्वतोपरी तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी १८ लाख १३ हजार ५६७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या निवडणुकीसाठी सुमारे ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. आयुक्तांपासून उपनिरीक्षकांपर्यंत सर्व अधिकारी, ५० कॉन्स्टेबल, ३५० होमगार्डस् व अन्य विविध तुकड्या बंदोबस्तावर राहणार आहेत.
जिल्ह्यातील ८ मतदारसंघांपैकी बेळगाव उत्तर, दक्षिण व ग्रामीण हे 3 विधानसभा मतदार संघ पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित येतात. या ठिकाणी बंदोबस्ताची सर्वतोपरी तयारी आयुक्तालयाने केली आहे.
विधानसभेच्या अन्य ५ मतदारसंघांतील बंदोबस्ताची तयारी जिल्हा पोलिस खात्याच्या अखत्यारित येते. बेळगाव उत्तर, दक्षिण व ग्रामीण या मतदारसंघांसाठी शहर सशस्त्र दल व केएसआरपीच्या ६ तुकड्या, जिल्हा सशस्त्र दलाच्या ४ तुकड्या, ५०० सिव्हील पोलिस, ६५० होमगार्डस् अन्य विभागातून दाखल होणार आहेत. शहरातील १५०० व बाहेरून येणारे १५०० असा सुमारे ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.निवडणुकीसाठी ४४ मोबाईल सेक्टर, १५ पर्यवेक्षक केंद्रे तयार करण्यात आली असून शुक्रवार दि, १६ एप्रिलपासून याची नजर प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार आहे.
संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राजवळ कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार आहे. परंतु, संवेदनशील मतदान केंद्राजवळ नेहमीपेक्षा अधिक पोलिस सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर ३६० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. हरीश कुमार यांनी दिली.
परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर ३६० बसेसची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यामधील २६० बसेस विजापूर येथून आणण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बेळगाव विभागातील ५० आणि चिकोडी विभागातील ५० बस येणार आहेत. मतदानासाठी कोविड मार्गसूचीचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. मतदारांनसाठीही सॅनिटायझरचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदार संघामध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत १८ लाख १३ हजार ५३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ९ लाख ११ हजार २५ इतकी असून, महिला मतदारांची संख्या ९ लाख २ हजार ४५५ इतकी आहे. तर इतर मतदारांची संख्या 58 आहे.
मतदार संघ, महिला मतदार आणि पुरुष मतदार.. अशी आहे एकंदर आकडेवारी
बेळगाव लोकसभा
मतदार संघ पुरुष मतदार महिला मतदार इतर एकूण मतदार
बेळगाव उत्तर १२०५०२ १२२१०५ ११ २४२६१८
बेळगाव दक्षिण १२२७०५ १२०३१६ ६ २४३०२७
बेळगाव ग्रामीण १२४१५८ ११९९२२ ४ २४४०८४
गोकाक १२३५३७ १२६४४२ १४ २४९९९३
बैलहोंगल ९५४७२ ९४३८३ ३ १८९८५८
अरभावी १२०५०३ ११९५०० ९ २४००१२
रामदुर्ग १०५००३ १०१५४८ ११ २०६५६२
सौंदत्ती-यल्लम्मा ९९१४५ ९८२३९ ० १९७३८४
एकूण ९११०२५ ९०२४५५ ५८ १८१३५३८