Thursday, December 26, 2024

/

बेळगाव पुन्हा कोरोनाच्या जाळ्यात! पुन्हा नवे ७६ रुग्ण

 belgaum

महाराष्ट्र, केरळसह आता संपूर्ण देशात पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे.

कर्नाटकात देखील दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत चालली असून आजच्या राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या हेल्थ बुलेटिन नुसार संपूर्ण कर्नाटकात आज ७९५५ कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले आहेत. तर बेळगाव जिल्ह्यात नव्या ७ रुग्णांची वाढ झाली आहे. तर पुन्हा कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा दुसरा संसर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारी या संसर्गामुळे सदर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यानंतर बेळगाव जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ३४७ वर जाऊन पोहोचली आहे.

सध्या बेळगाव जिल्ह्यात ५३१ रुग्ण कोरोनावर उपचार घेत असून दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा बेळगाव शहराला पडत असल्याची चिन्हे दिसत आहेत. एप्रिल २०२१ मधील पहिल्या ९ दिवसात ४९६ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज जिल्ह्यातील १९ रुग्ण कोरोनमुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.