बेळगाव जिल्ह्यात आज नव्याने ३१३ रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच आज एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १८५८ इतकी झाली असून आज नोंद झालेल्या रुग्णांची संख्या २०२१ मधील उच्चांकी रुग्णसंख्या आहे. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे बेळगाव तालुक्यातील असल्याचे निदर्शनास आले आहे.
आजच्या एका रुग्णाच्या मृत्युसह जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३५९ वर पोहोचली आहे. तर कोरोना उपचाराअंती तब्येतीत सुधारणा होऊन डिस्चार्ज घेतलेल्या रुग्णांची संख्या ६७ इतकी आहे.
तर १ एप्रिलपासून आतापर्यंत नव्याने नोंद झालेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २७९५ इतकी आहे.
आज नोंद झालेल्या ३१३ रुग्णांमध्ये अथणीमधील २१, बेळगाव तालुक्यातील १०४, बैलहोंगल मधील ८, चिकोडी मधील ९, गोकाक मधील ३९, हुक्केरी मधील १०, खानापूर मधील २५, रामदुर्गमधील १९, रायबाग मधील ४१, सवदत्ती मधील १६ आणि इतर २१ रुग्णांचा समावेश आहे.