बेळगाव जिल्ह्यात आज गुरुवारी नव्याने 255 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यु होण्याबरोबरच सक्रिय रुग्णसंख्या 1548 इतकी वाढली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एका 70 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एकूण 356 झाली आहे. उपचारांती पूर्णपणे बरे झाल्यामुळे आज दिवसभरात 90 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात गेल्या 1 एप्रिलपासून आत्तापर्यंत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता एकूण 2,262 इतकी झाली आहे.
दरम्यान, राज्यभरात आज एकूण 25,795 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील सर्वाधिक 118 रुग्णांसह गोकाक येथील 32, अथणी 26, हुक्केरी व सौंदत्ती प्रत्येकी 12, खानापूर 10, बैलहोंगल 9, रामदुर्ग 6, चिक्कोडी व रायबाग प्रत्येकी 5 आणि इतर 20 अशा एकुण 255 रुग्णांचा समावेश आहे.