Saturday, January 25, 2025

/

कोविड रुग्णांची पुन्हा शंभरी पार; एकाच मृत्यू

 belgaum

बेळगावमध्ये आज पुन्हा नव्या ११५ कोविडग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर सध्या ९८५ रुग्ण कोविड वर उपचार घेत आहेत.

राज्यभरात पुन्हा कोरोनाचे थैमान सुरु झाले असून दररोज शेकडोच्यावर रुग्ण कोरोनाग्रस्तांच्या यादीत येत आहेत.

१ एप्रिल पासून बेळगाव जिल्ह्यात एकूण १५२० रुग्णांची नोंद झाली असून एकूण ३५५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज ५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 belgaum

आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये अथणीमधील ९, बेळगाव तालुक्यातील ५७, बैलहोंगल मधील ४, चिकोडीमधील १, गोकाकमधील ८, हुक्केरीमधील ६, खानापूर मधील ३, रामदुर्ग मधील २, रायबाग मधील ५, सवदत्ती मधील १६ आणि इतर १६ अशा एकूण ११५ रुग्णांचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.