बेळगाव जवळील भूतरामनहट्टी राणी चन्नम्मा ‘मिनी झु’ मध्ये सिंहगर्जना सुरू झाली असताना आज पासून वाघ गर्जना देखील सुरू झाली आहे.
आज गुरुवारी मैसूर झू मधून दोन वाघ बेळगावच्या या ‘मिनी झू’मध्ये दाखल झाले आहेत. या दोन्ही वाघांना बेळगावच्या हवामानाशी जुळवून घेई पर्यंत दोन्ही क्वांरटाईन करण्यात आले आहे.
कनिष्क आणि शौर्य अशी बेळगावातील मिनी प्राणी संग्रहालयाचे सदस्य झालेल्या दोन वाघांची नावे आहेत.
आज गुरुवारी सी डी लेडी बेळगावला येईल आणि ए पी एम सी पोलिसांत हजर होईल याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या सगळा मीडिया देखील टपून बसला होता मात्र सी डी लेडी काही आली नाही बेळगावात दाखल झाले ते दोन वाघ…ती सिडी मधील युवती येईल ही अपेक्षा मात्र गुरुवारी तरी फोल ठरली.