मराठी भाषिक वाघ आहे असे स्टेटस ठेवल्यामुळे चार तरुणांना पोलिसांनी बेदम मारहाण केली .
शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या कारवर कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला करून कार वर लावलेल्या शिवसेना फलकाला काळे फासून मोडतोड केली होती.त्यावेळी जिल्हा शिवसेना प्रमुख आणि एक शिवसेना कार्यकर्ते यांनी त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रसंगाचा व्हिडिओ आणि फोटो काही जणांनी फेसबुक वर पोस्ट करून स्टेटस ठेवून मराठी भाषिक वाघ आहे असे लिहिले होते.
हे पाहून पोलिसांनी चार तरुणावर केसीस दाखल केल्या आहेत.या चार तरुणांना पोलिसांनी अमानुष मारहाण देखील केली.पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याने त्या तरुणांच्या पाठीवर वळ देखील उठले आहेत.