बेळगाव स्मार्ट सिटीचा अभियंता ठेकेदाराकडून सी बी टी बस स्थानकाचे बिल मंजूर करून देण्यासाठी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ अडकला आहे.
अपूर्व कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट मॅनेजर संजीव नवलगुंद यांनी दिलेल्या तक्रारी वरून ही कारवाई करण्यात आली आहे.अपूर्वा कन्स्ट्रक्शन कंपनी बेळगावं बस स्थानकाचे काम करत आहे.
बेळगाव स्मार्ट सिटीचे तांत्रिक विभागाचे जनरल मॅनेजर सिद्ध नायक दोद्दबसप्पा यांना अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरात धाड टाकून बिलाचे 5 टक्के कमिशन म्हणून 60 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
ए सी बी अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या घरात धाड टाकून तपासणी केली असता घरातील 23 लाख 56 हजार रुपये देखील जप्त करण्यात आले आहेत. ए सी बी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.
अँटी करप्शन विभागाचे पोलीस अधीक्षक न्यामगौडर, उप अधीक्षक जे एम करुणाकर शेट्टी,पोलीस निरीक्षक ए एस गोदीकोप्प,सुनील कुमार आदी सहकाऱ्यांनी कारवाई केली आहे.