कर्नाटकाच्या राजकारणात एका आक्षेपार्ह अश्लील सीडी प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली होती. या आक्षेपार्ह सेक्स स्कँडलमध्ये भाजपा सरकारमधील जलसंपदा मंत्री, भाजपचे नेते, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर आता आक्षेपार्ह अश्लील व्हिडीओ प्रकरणात सामील झालेल्या चौघांना एसआयटीने अटक केले आहे. सीडी प्रकरणात गुंतलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी पोलीस, एसआयटी व अन्य तपास यंत्रणांनी तपासाची घोडदौड सुरु केली आहे. जारकीहोळींच्या ‘सीडी’ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या एसआयटीने शुक्रवारी कन्नड टीव्हीच्या अनेक पत्रकारांना चौकशीत हजर राहण्यास सांगून आपल्या तपासाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. प्रसारमाध्यमांना पुरविण्यात आलेल्या व्हिडीओ क्लिपचा स्रोत शोधण्यासाठी कसून चौकशी करण्यात येत आहे.
आजपासून चौकशी करीत असलेल्या एसआयटी अधिकार्यांनी पहिल्याच दिवशी दिनेश कल्लहळ्ळीला सीडी देणार्याला यशवंतपूरमधील एकाला अटक करून ताब्यात घेतले आहे. सौमेंद्र मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीमने सीडी देणार्या एका व्यक्तीसह तिघांना चामराजपेठ, विजनगर, रामनगर येथून अटक करत तपास सुरू केला आहे. सीडी प्रकरणात गृहमंत्र्यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.
तत्पूर्वी, गृहमंत्री बसवराज बोम्माई यांच्या निर्देशानंतर बंगळुरू शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम) सौमेंदू मुखर्जी (पश्चिम) यांच्या अध्यक्षतेखाली-सदस्यीय एसआयटी स्थापन केली. एसआयटी टीममध्ये सीसीबीचे सहआयुक्त संदीप पाटील, सीसीबीचे डीसीपी रविकुमार, डीसीपी (मध्य) अनुचेत आणि एसीपी धर्मेंद्र याशिवाय सीसीबी निरीक्षक आणि कबन पार्क पोलिस स्टेशनचे निरीक्षक यांचा समावेश आहे. मुखर्जींना त्यांच्या संघात इतर कोणत्याही अधिकाऱ्याचा समावेश करण्यासाठी मुभा देण्यात आल्याची माहिती आहे.
तथापि, एसआयटी स्थापन करण्याच्या कमल पंत यांच्या ११ मार्चच्या आदेशात कोणत्याही प्रकारची एफआयआर नोंदविण्याची किंवा कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचे कोणतेही अधिकार निर्दिष्ट नाहीत.