Sunday, December 22, 2024

/

बेळगावात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवा : खा. राऊत

 belgaum

मराठी भाषिकांवरील हल्ले पहाता कर्नाटकातली सुव्यवस्था बिघडली आहे विशेषतः बेळगावातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. यासाठी बेळगावात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन शिष्टमंडळ पाठवून तेथील मराठी भाषिकांचे रक्षण करायला हवे, असे मत महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली येथे एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. बेळगावात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवावे नाहीतर हा तणाव वाढेल मी सुद्धा बेळगावात जायचा प्रयत्न करणार आहे.बेळगाव देखील या देशाचा अविभाज्य घटक आहे कर्नाटकातील लोक मुंबई महाराष्ट्र आणि बेळगावात येऊ शकता?मग आम्हाला का रोखले जात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रीय एकात्मता आम्ही मानतो आणि कर्नाटकने ही ती मानावी जर कर्नाटकाने आम्हाला भाग पाडलं तर आम्ही उचलणारी पाऊल सरकरी नसतील तर राजकीय असतील असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला.

शेवटी हा देश एक आहे बेळगाव हा देशाचा अंतर्गत प्रश्न आहे तो पंतप्रधान आणि गृहमंत्री सोडवू शकतात.केंद्र सरकारने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मनावर घेतले तर हा भाषावाद सुटू शकतो असे मत देखील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.