आजकाल व्हीडिओ पहाण्यासाठी पेन ड्राइव्हचा जमाना असला तरी रमेश जारकीहोळी यांच्या प्रकरणात माध्यमाना सी डी वाटण्यात आल्या.कर्नाटकात अश्लील सी डी प्रकरणामुळे मंत्री रमेश जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागला.त्यामुळे कर्नाटकातील राजकारणी आणि राजकारण हा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय झाला आहे.
पण कर्नाटकात हे घडलेले काही पाहिले प्रकरण नव्हे.आरोप झाल्यामुळे राजीनामा द्यावा लागेल ले जारकीहोळी काही पाहिले मंत्री नव्हेत.यापूर्वी देखील वेगवेगळे आरोप झालेल्या मंत्र्यांना देखील राजीनामा द्यावा लागलेला आहे.
कर्नाटकाचे दिवंगत मुख्यमंत्री निज लिंगाप्पा,वीरेंद्र पाटील यांच्या साठ आणि सत्तर च्या दशकात सी डी चा जमाना नव्हता.नंतर नव्वद च्या दशकात मोठ्या आकाराच्या व्हिडिओ कॅसेट चा जमाना आला.
त्या काळात देखील रसिक राजकारणी होतेच,नव्हते असे नाही. काळ बदलला असे लोक म्हणू लागले ते कर्नाटकचे मुख्यमंत्री देवराज अरस सत्तेवर आल्या नंतर.राज्यातल्या राजकारणात पहीलेंदा खळबळ माजवली ती सुमित्रा देसाई यांनी.तेव्हा काग वाड मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेलेले आर.डी. कित्तुर यांना हे प्रकरण शेकले होते.त्यावेळी या बातमीच्या वृत्तपत्रात हेड लाईन आल्या होत्या.या प्रकरणामुळे कितुर यांना नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागला होता.
सुमित्रा देसाई ही राजकारणी व्यक्तींच्या बरोबर जवळीक साधून होती. कित्तुर यांच्या बंगलोर येथील निवासस्थानी ती दिसली होती.या कारणामुळे कित्तुर यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.नंतर 2001 मध्ये कंत्राटदारा कडून वीस हजार रुपये स्वीकारण्याचा व्हिडिओ उजेडात आल्यामुळे आरोप सिध्द झाला नाही तरी व्हीं. एस.कौजलगी यांना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.नंतर एस एम कृष्णा यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्रिपद त्यांना मिळाले होते.नंतर रामकृष्ण हेगडे यांच्या सरकारात मंत्री असलेल्या नेत्या समवेत नेहमी गोव्याची एक महिला असत होती.
नेहमी त्या मंत्र्यासोबत तिचा वावर असायचा.या बाबत एका साप्ताहिकात देखील छापून आले होते.त्याच अंकात आणखी एका मंत्र्याचे आणि अभिनेत्रीचे नाव देखील जोडले गेल्याचे वृत्त आले होते.पण तेव्हा काही त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली नव्हती.