सतीश जारकीहोळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब-बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिकृत घोषणा बंगळूर येथे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे.
काँग्रेस आणि भाजपामध्ये उमेदवारी जाहीर करण्यावरून जोरदार रणनीती सुरू होती.
आधी काँग्रेस की आधी भाजप अशा जोरदार स्पर्धेनंतर काँग्रेसतर्फे उमेदवाराचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
काँग्रेसने उमेदवारी जाहीर करून पहिली बाजी मारली आहे. आता प्रतीक्षा आहे ती, बहुचर्चित भाजपच्या उमेदवाराची. भाजपमधील ढीगभर इच्छुकांच्या यादीतून सतीश जारकीहोळी यांना करडी टक्कर देण्यासाठी भाजप कोणत्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरवणार याकडे जनतेचे लक्ष आहे.