लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अद्याप राष्ट्रीय पक्षांनी जाहीर केले नसून सतीश जारकीहोळीचे नांव काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुचविण्यात येत आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सतीश जारकीहोळींना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला आहे. बंगळूरमध्ये आज सकाळी ११ वाजल्यापासून केपीसीसी कार्यालयात आज काँग्रेस वरिष्ठांची बैठक झाली.
लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उमेदवारी जाहीर करण्याकडे राष्ट्रीय पक्षांची लगबग सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज बंगळूरमध्ये झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत सतीश जारकीहोळी यांचे नांव अग्रस्थानी आहे.
ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नावाची शिफारस काँग्रेस वरिष्ठांकडे करण्यात आली होती.
परंतु आता काँग्रेस वरिष्ठांकडून सतीश जारकीहोळी यांचे नांव सुचविण्यात आले असून तुम्हीच निवडणूक लढवा असा आग्रहदेखील करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.