कर्नाटक राज्यात महसूल गोळा करण्यामध्ये महत्त्वाचे पाऊल आरटीओ विभागाकडे असते. अनेक नियम डावलून वाहने चालविनाऱ्यावर आरटीओ तसेच पोलिस अधिकाऱ्यांची नजर असते.
त्यामुळे त्यांच्याकडून दंड वसूल करून तो सरकारदरबारी जमा करण्यात येतो. बेळगाव आरटीओ कार्यालय ही दंड वसूल करण्यात मागे नाही. मात्र येथील कारभार फक्त दोन इन्स्पेक्टर वर चालतो. त्यामुळे राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान बेळगाव आरटीओ कार्यक्षेत्रात 16 इन्स्पेक्टरची गरज असते. मात्र केवळ दोन इन्स्पेक्टरवर हा सारा डोलारा सुरू आहे. परिणामी दंड वसूल करण्यामध्ये आरटीओ कार्यालयाला मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत आरटीओ कार्यालयातील अधिकारी दंड वसूल करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे इन्स्पेक्टरचे काम संबंधित कचरे अधिकारी व इतरांना लागत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
त्यामुळे आरटीओ विभागात नुतन इन्स्पेक्टरची नेमणूक कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून करण्यात येत आहे. बेळगाव तालुका आणि खानापूर तालुका हे आरटीओ कार्यक्षेत्रात येते. मात्र इन्स्पेक्टर नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचबरोबर महसूल गोळा करण्यात ही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात ही कारवाई होत असली तरी इतर ठिकाणी कारवाई करण्यात आरटीओ अधिकारी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. याला कारण ही नव्याने भरती न करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे. 16 इन्स्पेक्टर ऐवजी 10 इन्स्पेक्टर यांची तरी नेमणूक करावी. सध्या दोन इनिस्पेक्टरवर सारा कारभार सुरू असल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.