सी डी प्रकरणाने ट्विस्ट घेतलं असून सामाजिक कार्यकर्ते दिनेश कलहळळी यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आहे. गेल्या 2 मार्च रोजी बंगळूरू येथील कब्बन पार्क पोलिसांत त्यांनी ही तक्रार दाखल केली होती.
दिनेश यांनी आपले वकील कुमार यांच्या मार्फत तक्रार वापस घेत असल्याचे पत्र दिले आहे मात्र दिनेश स्वता का पोलीस स्थानकात तक्रार वापस घ्यायला आले नाहीत यावर वकील कुमार तांत्रिक कारण सांगून तक्रार वापसीचे पत्र दिले आहे.
गेल्या आठवड्यात दिनेश यांनी जारकीहोळी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली व त्या मुलीला नोकरीचे आमिष देऊन सेक्स केल्याचा आरोप करत सी डी प्रसिद्ध केली होती याची दखल भाजप केंद्रीय नेतृत्वाने घेतली होती त्यामुळे रमेश जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागला होता.
माजी मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी यांनी या प्रकरणी 5 कोटींचा व्यवहार झाला असल्याचा आरोप केला त्यामुळे माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह उभे केले होते असे स्पष्टीकरण दिनेश कलहळळी यांनी कन्नड वृत्त वाहिन्याशी बोलताना दिले आहे.
लोक मला फोन करून प्रश्न विचारत आहेत मंगळुरू ते बिदर पर्यन्त अनेकांचे मला फोन येताहेत कुमार स्वामी यांच्या आरोपा नंतर माझ्या विश्वासाहर्तेवर प्रश्न उभे केले आहेत.आता मी चौकात मोकळेपणाने फिरू शकत नाही सगळेजण मला संशयाच्या नजरेतून पहात आहेत म्हणून मी वकिलांचा सल्ला घेऊन तक्रार मागे घेतली आहे.
माध्यमांना मी सी डी किंवा व्हीडिओ दिला नव्हता तर सदर व्हीडिओ अगोदरच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता पीडित मुलींच्या कुटुंबियांनी मला संपर्क केल्याने मी कब्बन पार्क पोलिसात तक्रार दिली होती असेही ते म्हणाले.
कुमार स्वामी यांच्या आरोपावर या प्रकरणी 5 कोटींचा व्यवहार झालाय यावर तपास होणे गरजेचे आहे असे मत दिनेश कलहळळी यांनी व्यक्त केले आहे.माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपामुळे मी व्यथित झालो असून वकिलांनी तक्रात मागे घेण्याचा सल्ला दिल्याने आपण तक्रार मागे घेत असल्याचे दिनेश यांनी सांगितले.