रायचूर, मस्की विधानसभा निवडणूक शिवसेना लढविणार-रायचूर आणि मस्की विधानसभा निवडणूक शिवसेना लढविणार असल्याचा निर्णय आज हुबळी येथे झालेल्या शिवसेना बैठकीत घेण्यात आला.
हुबळी येथील शिवसेना कार्यालयात झालेल्या बैठकीत इच्छुक उमेदवारांना बी फॉर्म देण्यात आला आहे. मस्की विधानसभेसाठी अंजनीया नायक या वाल्मिकी समाजातील नेत्याला उमेदवारी देण्यात आली आहे.
तर बिदर जिल्ह्यासाठी मराठी समाजाचे पैलवान अंकुश कपनुरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बसावं कल्याण विधानसभेसाठी देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या बैठकीला राज्यसंपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, अंजनीया नायक, उत्तर कन्नडचे उपराज्यप्रमुख कुमार हाकाटी, कार्याध्यक्ष विनायक माळदकर, कुबेर पवार, यावेळी बेळगाव येथील के. जी. पाटील आदी उपस्थित होते.