Thursday, January 2, 2025

/

प्रसाद बाचेकर यंदाचा “बेळगाव श्री”

 belgaum

सर्वांपेक्षा सरस असणाऱ्या आपल्या पिळदार शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करत एसएसएस फाऊंडेशनच्या प्रसाद बाचेकर याने मराठा युवक संघ आणि बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेळगाव जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील यंदाचा प्रतिष्ठेचा “बेळगाव श्री” हा मानाचा किताब हस्तगत केला. स्पर्धेतील बेस्ट पोझर किताबाचा मानकरी उमेश गंगणे हा ठरला.

रेल्वे ओव्हरब्रीज खानापूर रोड येथील मराठा मंदिरच्या सभागृहांमध्ये काल शुक्रवारी रात्री सदर 55 वी बेळगाव श्री शरीरसौष्ठव स्पर्धा उस्फुर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी प्रमुख पाहुणे दिल्ली येथील कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार आदी मान्यवरांच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन, श्री हनुमान मूर्तीचे पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले.

प्रारंभी मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. आयबीबीएफ मुंबई यांच्या नियमानुसार विविध सात वजनी गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत यंदा 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचा गटवार अंतिम निकाल खालील प्रमाणे आहे.

55 किलो वजनी गट : 1) उमेश गंगणे (एसएसएस फाउंडेशन), 2) किरण तरळे, 3) शान्वल अंकले, 4) राहुल दानोजी, 5) राजकुमार दुरगुडे. 60 किलो वजनी गट : 1) अनिल मोहनगेकर (एसएसएस फाउंडेशन), 2) राहुल परेरा, 3) उमेश करडी, 4) शिवकुमार पाटील 5) चन्नय्या कलमठ. 65 किलो वजनी गट : 1)राकेश कांबळे (बास जिम), 2) प्रताप कलकुंद्रिकर, 3) प्रशांत पाटील, 4) दिनेश कुट्रे, 5) बसवराज कंग्राळकर.

70 किलो वजनी गट : 1) पी. जी. गावडे (एसएसएस फाउंडेशन), 2) सुनील भातकांडे, 3) गणेश पाटील, 4) विनय एस. डोणकरी, 5) महेश गवळी. 75 किलो वजनी गट : 1) अफरोज तहसीलदार (गोल्ड जिम), 2) दयानंद निलाजकर, 3) शाहीपीर शेख, 4) मौफिज मुल्ला, 5) नामदेव तिनेकर. 80 किलो वजनी : 1) प्रसाद बाचेकर (एसएसएस फाउंडेशन), 2) नितीन पाटील, 3) गजानन काकतीकर, 4) डेनिस एस. मेंझीस, 5) किरण देसुरकर. 80 किलोवरील वजनी गट : 1) व्ही. एस. किरण (कार्पोरेशन जीम), 2) सन्नी मयेकर, 3) युवराज शिंदे, 4) समंतगौडा. बेळगाव श्री टायटल विजेता : प्रसाद बाचीकर. बेस्ट पोझर : उमेश गंगणे.Maratha yuvak sangh

स्पर्धेनंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे बुडाचे चेअरमन गुंडाप्पा होसमनी, सरकारचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, डीसीपी चंद्रप्पा निलगार आदी मान्यवरांच्या हस्ते टायटल आणि बक्षिसांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, दिनेश घोरपडे, आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, शेखर हंडे, नेताजी जाधव, मि. इंडिया सुनील आपटेकर, लक्ष्मण होनगेकर, शिवाजी हंगिरगेकर, नारायण किटवाडकर, विश्वास पवार, बंडू मजुकर, मोहन सप्रे, संजय मोरे, सुनील भोसले, पांडुरंग जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दण्णावर, सूनील आपटेकर, एम. के. गुरव, एम. गंगाधर, वासुदेव साखळकर, नूर मुल्ला, अनिल अमराळे, अनंत लंगरकांडे सुनील पवार, राजू नलावडे, सुनील अष्टेकर, हेमंत हावळ व स्टेज मार्शल म्हणून सुनील राऊत यांनी काम पाहिले. या शरीरसौष्ठव स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी सालाबादप्रमाणे क्रीडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.