पोलीस विभागाच्या कार्यतत्परतेमुळे बेळगाव शहर गुन्हेगारीसह मटका, गांजा आणि जुगार यापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. पोलीस विभागातर्फे यासाठी सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. यासह आता डीसीपी विक्रम आमटे यांनी पोलीस व्हेरिफिकेशन संदर्भात एक नवी खुशखबर दिली आहे. आता बेळगावमध्ये पोलीस वेरिफिकेशनसाठी येणाऱ्या अर्जन केवळ तीन दिवसात पुढची दिशा मिळणार आहे.
बेळगावमधील जनता पासपोर्टसाठी लागणाऱ्या पोलीस वेरिफिकेशनसाठी पोलीस स्थानकात अर्ज सादर करते. या कागपत्रांच्या चौकशीसाठी अनेकवेळा पोलीस स्थानकाच्या फेऱ्या माराव्या लागतात. पोलीस वेरिफिकेशनसाठी केलेल्या अर्जाचे गठ्ठे स्थानकात अनेकदिवस प्रलंबित असतात. तसेच सातत्याने अर्जदारांकडून पोलीस वेरिफिकेशनसाठी सातत्याने तगादाही लावण्यात येतो. याची दखल घेत पोलीस उपयुक्त विक्रम आमटे यांनी मास्टर प्लॅन राबवून जनतेसाठी पोलीस व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुलभ केली आहे. पोलीस व्हेरिफिकेशन प्रक्रिया तीन दिवसाच्या आत पूर्ण करून चौकशी आणि संपूर्ण कागदपत्रांची वैधता तपासून तीन दिवसाच्या आत पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देण्याची मुभा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पूर्वी पोलीस व्हेरिफिकेशन संदर्भातील संपूर्ण चौकशीसाठी २१ दिवसांच्या अवधी लागायचा. बेळगाव शहराच्या हद्दीत असणाऱ्या अर्जदारांची तीन दिवसाच्या आत चौकशी करण्यात येऊन त्यानंतर पासपोर्ट कार्यालयात पोलीस व्हेरिफिकेशन कागदपत्रे देण्यात यायची. यासंदर्भात अर्जदारांना अनेक अडचणी यायच्या. याची दखल घेत या समस्येपासून डीसीपी विक्रम आमटेंनी अर्जदारांना सुलभ अशी सोय केली आहे. यासाठी अर्जदारांनी वैध कागदपत्रे सादर करणे आवश्यक असून ज्या अर्जदारांवर फौजदारी खटला दाखल असेल असे अर्ज नाकारण्याची आणि तीन दिवसात या अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात सूचना करण्यात आली आहे.