प्लुटोच्या शब्दात संगीत हे जगाचा आत्मा आहे. मनाचे पंख आहेत. कल्पनेची भरारी आहे आणि सर्वांचे जीवन आहे. आपण संगीतासाठी वेडे झालेले लोक पाहतो. भारतात तर संगीताची प्रचंड आवड आहे. ही करामत बॉलीवूडच्या चमचमत्या चंदेरी दुनियेने केली आहे. संगीत गाण्याचे वेड लावले आहे.
बेळगावमध्ये अशी एक संगीतप्रेमी व्यक्ती असून जीचे संगीताबद्दलचे प्रेम अद्वितीय आहे. या व्यक्तीला भेटण्यासाठी तुम्हाला शेट्टी गल्ली कॉर्नरवरील दोन हिरव्या वर्णांनी रंगविलेल्या दुमजली इमारतीला भेट द्यावी लागेल. सदर व्यक्तीचे नांव आहे डॉ. जमील अहमद अम्मणगी, जे व्यवसायाने होमिओपॅथिक डॉक्टर आहेत.
जमील यांना संगीताची जन्मजात आवड आहे. बालपणापासूनच त्यांना बॉलिवूडचे संगीत ऐकण्याचे वेड आहे. आपल्या जुन्या रेडिओवर अथवा रस्त्यावर कोठेही गाणी ऐकणे ही त्यांची अत्यंत आवडीची गोष्ट आहे. रेडिओवर ते तासन-तास गाणी ऐकण्यात रमून जातात. जमील जेंव्हा कमवायला लागले, तेंव्हा त्यांनी उत्पन्न कमी असतानाही संगीत ऐकण्यासाठी एक टेपरेकॉर्डर आणि गाण्याच्या टेप खरेदी केल्या. लवकरच अन्य कर्त्या पुरुषांप्रमाणे त्यांनी पूर्ण क्षमतेने कामाला सुरुवात केली तरी त्यांचे संगीताबाबत असे प्रेम कणभर देखील कमी झाले नाही. दररोज जास्तीत जास्त गाणी ऐकण्याकडे त्यांचा कल असायचा.
गेल्या 2000 सालच्या प्रारंभी जमील त्यांच्या आवडीच्या बाबतीत दिलासादायक बाब घडली ती म्हणजे बाजारात संगीत व गाण्याच्या सीडी उपलब्ध होऊ लागल्या आणि जमील यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांना सर्व सीडी खरेदी करावयाच्या होत्या. त्यावेळी त्यांचा दर खूप असला तरी जमील यांच्या संगीताच्या वेडा समोर तो नगण्य होता. सर्वजण ज्यांना जमील म्हणतात त्या डॉ. अम्मणगी यांचा संगीत -गाण्याच्या तयार झालेल्या सर्वच्या सर्व सीडी आपल्याकडे असाव्यात असा ध्यास होता. बॉलीवूडमध्ये गायलेले प्रत्येक गाणे आपल्याकडे असावे असे त्यांना वाटायचे. त्यांच्या या आवडीचे लवकरच छंदात रूपांतर झाले आणि त्यांनी सिडी खरेदीला सुरुवात केली.
प्रारंभीच्या काळात कृष्णधवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट सिडी येत होत्या. त्यानंतर आकर्षक रंगातील सीडी बाजारात उपलब्ध झाल्या. जमील यांना सीडी जमविण्याचे इतके वेड लागले की आज त्यांच्याकडे सीडीवर मुद्रित झालेल्या बॉलिवुडच्या चक्क 1947 पासूनच्या प्रत्येक गाण्याच्या सीडी आहेत. तुम्ही जर त्यांच्यासोबत बसाल तर हसतमुख चेहऱ्याने मोठ्या आनंदाने ते आपल्याकडील गेल्या 20 वर्षापासून जमविलेल्या 30,000 सीडींचा खजाना तुमच्यासमोर खुला करतील. या सीडीज त्यांनी प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये घालून मोठ्या काळजीपूर्वक आपल्या कपाटात ठेवल्या आहेत. डॉ. जमील अम्मणगी यांनी आपल्या सीडी संग्रहासाठी आजतागायत सुमारे 4,00,000 रुपये खर्च केले आहेत. त्यांच्याकडे गेल्या 60 वर्षातील प्रत्येक चित्रपटातील प्रत्येक गाणे आहे. त्यांच्या घरात या सीडी वगळता इलेक्ट्रॉनिक अथवा ऐशोआरामाच्या फारशा वस्तू नाहीत. जमील आपल्या पत्नी सोबत राहतात, ज्यांना आपल्या पतीच्या संगीत प्रेमाचे कौतुक आहे आणि याबाबतीत त्या त्यांना कधीच विरोध करत नाहीत.
तुम्हाला कोणती गाणी आवडतात? या प्रश्नाला ‘जुनी गाणी’ असे जमील यांचे तडकाफडकी उत्तर असते. आजकालच्या नव्या गाण्यांना फारसा अर्थ नसतो असे मत व्यक्त करणाऱ्या जमील यांचा आवडता गायक किशोर कुमार हा आहे. किशोर कुमार यांनी गायलेले प्रत्येक गाणे त्यांच्या संग्रही आहे. एजंट विनोद, आनबाण, मन का मीत, परवाना, दो जासूस आदी असंख्य चित्रपटांच्या सीडींची न संपणारी यादी डॉ. अम्मणगी यांच्या संग्रहात आहे. त्यातील कांही चित्रपटांची आपल्याला माहिती देखील नाही. मला मुलं ही नाहीत आणि माझी मोठी मालमत्ता देखील नाही. या सीडीच माझे सर्व कांही आहेत. ज्यांनी मला माझ्या संपूर्ण जीवनात अत्यंत समाधान दिले आहे.
आजच्या युगात ऑनलाईन आणि पेन ड्राईव्हमध्ये संगीत उपलब्ध असताना जागा व्यापणारा सीडी हा प्रकार आपल्याला अडचणीचा आणि निरुपयोगी वाटू शकतो. परंतु जमील यांच्यासाठी तो अमूल्य ठेवा आहे. अशा उत्कंठा संगीत प्रेमींमुळेच आज संगीत जिवंत आहे. तुमच्या पश्चात या सीडींचे काय होणार? या प्रश्नाला उत्तर देताना ‘मला आयुष्यभर साथ देण्याचा आपला हेतू त्यांनी साध्य केला आहे’, असे डॉ. जमील अहमद अम्मणगी सांगतात. हवेत संगीत आहे, संगीत आपल्या सभोवार सर्वत्र आहे, हे जग आपला आहे, तुम्हाला हवे तेवढे घ्या, असे एडवर्ड एल्गर म्हणतात. परंतु डॉ. जमील अम्मणगी सारख्या संगीतप्रेमींसाठी ते पुरेसे नाही, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.
Article courtasy -AAB and Dr madhav Prabhu