परिक्षेशिवाय कुणालाही पुढच्या वर्गात घातले जाणार नाही. तसेच यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही असे कर्नाटकाचे शिक्षणमंत्री एस सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. काल सायंकाळी ते बेंगळुर येथे पत्रकारांशी बोलत होते.
काही शाळांनी अफवा पसरविण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी परीक्षा घेतली जाणार नाही आणि उन्हाळी सुट्टी नंतर सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात घातले जाईल, अशी ती अफवा आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण तयार होऊ शकते. यासाठी कुणीही अफवा पसरवू नयेत असे आवाहन मंत्री सुरेशकुमार यांनी केले आहे.
उन्हाळ्याची सुट्टी देण्याची कोणतीही योजना नाही. पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दूरदर्शन आणि स्थानिक माध्यमांचा वापर करून शिक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.