लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी आज वार्ताभवनला भेट दिली. लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसंदर्भात प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि जाहिरातींवर कटाक्षाने लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
गुरुवारी के. हरिशकुमार यांनी मीडिया मॉनिटरिंग स्केलला भेट देऊन पाहणी केली. आणि उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. निवडणुकीसंदर्भात कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचा टीव्ही, केबल टीव्ही, सोशल मीडिया, सिनेमागृह, एलईडी किंवा वाहनाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रचारावर, जाहिरातींवर किंवा कोणत्याही प्रकारच्या बातम्या प्रकाशनावर कडक लक्ष ठेवावे, तसेच यासदंर्भातील सामग्रीसाठी एमसीएमसीमधून पूर्व अनुमती घेणे आवश्यक असल्याचे के. हरिशकुमार यांनी स्पष्ट केले.
प्रचारासाठी सर्वप्रथम परवानगी घेणे आवश्यक असून परवानगीविना कोणत्याही पद्धतीचा प्रचार करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे हरिशकुमार यांनी स्पष्ट केले.
तसेच प्रसारमाध्यम संस्थांनी पूर्वपरवानगी मिळालेल्या जाहिराती प्रकाशित कराव्यात. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्गसूचीचे पालन करावे. आणि न्यायपद्धतीने हि निवडणूक पार सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी केले.
मीडिया मॉनिटरिंग केंद्रात उपस्थित असलेले नोडल अधिकारी गुरुनाथ कडबूर यांनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि जाहिरातींवर लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले. यावेळी निसार अहमद, झेड. जी. सय्यद, विनायक वन्नुर, के. आर. कुलकर्णी, एम. एम. पाटील, जी. वाय. कावळे, के. एस. कागल, वज्रा पाटील, जे. डी. हळेमनी आदींसह इतर अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.