बेळगांव जिल्ह्यात गेल्या 24 तासांत नव्याने 37 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यापैकी सर्वाधिक 20 रुग्ण रामदुर्ग तालुक्यातील आहेत. या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 27,163 झाली आहे.
बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज शुक्रवार दि. 19 मार्च 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 5,55,184 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 20,204 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 163 आहे.
काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 26,473 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 5,08,344 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 5,54,092 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 27,163 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज शुक्रवारी नव्याने आढळलेल्या 37 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 5,21,739 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 163 आहेत. त्याचप्रमाणे 2,192 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 342 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 26,659 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज शुक्रवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये रामदुर्ग तालुक्यातील 20, बेळगांव 8, चिक्कोडी 2, गोकाक 2, हुक्केरी 2, खानापूर 1 रायबाग 1 आणि इतर 1 आणि इतर 1 अशा एकूण 37 रुग्णांचा समावेश आहे.