बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेतेमंडळी बेळगावदौऱ्यावर येत आहेत. भाजपचे राज्यध्यक्ष नलिनकुमार कटील आज बेळगाव दौऱ्यावर आले आहेत. बेळगावमध्ये सांबरा विमानतळावर आलेल्या नलिनकुमार कटील यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
सिद्धरामय्या यांनी कुणाचे पाय धरून मुख्यमंत्री पद मिळविले होते, हे सर्वांना माहित आहे. सिद्धरामय्या कुणाचे गुलाम आहेत हे संपूर्ण देशाला माहीत आहे, अशी टीका नलिनकुमार कटील यांनी केली.
सांबरा विमानतळावर आलेल्या नलिनकुमार कटील यांनी सिद्धरामय्या यांना केंद्र सरकारचे गुलाम असे संबोधित करत प्रसारमाध्यमांसमोर टीका केली.
रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणाबद्दल बोलताना ते म्हणाले, सीडी प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. सिद्धरामय्या यांनी सीडी प्रकरणी ज्या पद्धतीने वक्तव्य करण्यास सुरु केले आहे.
सीबीआय, आयटी, एसआयटी वर सिद्धरामय्या यांचा विश्वास नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचपद्धतीने त्यांचेही सीडी प्रकरण असेच गाजले होते. त्यामुळे त्यांचा विश्वास काय आहे, कसा आहे, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, अशी टीका नलिनकुमार कटील यांनी केली.