तथाकथित कन्नड संघटनेच्या वतीने मराठी व्यापाऱ्यांच्या दुकाने, आस्थापनामध्ये घुसून धुडघुस घातला जात आहे आणि मराठी फलक फाडून त्यांना काळे फासले जात आहे,
तरी अश्या गुंडांचा वेळीच बंदोबस्त करावा यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तांना उद्या शनिवार रोजी निवेदन दिले जाणार आहे.
शनिवारी सकाळी 11.00 वाजता युवा समिती आणि मराठी भाषिकांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे तरी सर्वानी पोलीस आयुक्तालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन युवा समितीच्या वतीन करण्यात आले आहे.
शुक्रवारी दिवसभरात काकती येथील हॉटेल वरील फलक व शिवसेनेच्या रामलिंग खिंड गल्लीत शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या गाडी वरील फलक मोडतोड कन्नड कार्यकर्त्यांनी केली होती.
त्याविरोधात मराठी भाषिकात संताप व्यक्त होत असून अश्या कानडी कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी युवा समितीच्या वतीनं पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन केली जाणार आहे.