बेळगाव जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणामार्फत 27 मार्च रोजी भव्य लोक अदालत भरविण्याचे आयोजन करण्यात आले असून गुन्हेगारी व दिवाणी खटल्यांवर सुनावणी करण्याच्या उद्देशाने हि लोकअदालत भरविण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश जोशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गुन्हेगारी व दिवाणी खटल्यांचा तडजोड निकाली काढण्याच्या उद्देशाने 27 मार्च रोजी भव्य लोक अदालत आयोजित केली आहे. मागील वेळीदेखील एक वेगळा प्रयोग करण्यात आला होता. दरम्यान बरीच प्रकरणे तसेच नवीन प्रकरणे निकाली निघाली.
या वेळी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या सेवांचा वापर करुन ही अदालतदेखील यशस्वी होईल. मागील वेळी , कोविडच्या पार्श्वभूमीवर पक्षकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क करण्यात आला होता. आता कोविड परिस्थिती नियंत्रणात आली असून म्हणावी तशी कोविड संदर्भात भीती नसल्याने समोरासमोर बोलणी केली जाऊ शकते.
यादरम्यान लोकअदालत कायद्याच्या काही नियमांच्या आधारे प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे. तसेच धनादेश न वटलेल्या प्रकारणांचाही निकाल लावण्यात येणार असल्याची माहिती न्यायाधीश जोशी यांनी दिली.