एलआयसी ऑफ इंडियाने लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑप . सोसायटी सोबत व्यवसाय सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले . एलआयसीचे वरिष्ठ विभागिय व्यवस्थापक ए . डी . वारकरी व लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी करारपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या .
लोकमान्य सोसायटी २०१७ पासुन एलआयसीची कार्पोरेट सहयोगी संस्था म्हणून कार्यरत आहे . लोकमान्यने पहिल्या दिवसापासून एलआयसीच्या पोलिसीची विक्री केली आहे . लोकमान्य सोसायटीच्या २१३ शाखांमधून एलआयसीच्या सर्व विमा पॉलिसींची विक्री व जाहिरात केली जाते . त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत माहिती पोहोचविली जात आहे .
यावेळी बोलताना एलआयसीचे वरिष्ठ विभागिय व्यवस्थापक ए . डी . वारकरी यांनी लोकमान्यच्या यावर्षीच्या योगदानाबद्दल तोंडभरून कौतुक केले . तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . लोकमान्यने आतापर्यंत ५११ पॉलिसी विक्री केल्या आहेत . यातून ४.७६ कोटी रूपयांचा वार्षिक हप्ता भरला जातो . यामुळे बेळगावविभागात लोकमान्यने प्रथम क्रमांक पटकाविला आहे .
बेळगाव विभागात बेळगाव , विजापुर , व बागलकोट या जिल्ह्यांचा समावेश होतो . तसेच दक्षिण मध्य विभागात दहावा क्रमांक मिळविला आहे . दक्षिण मध्य विभागात कर्नाटक , आंध्रप्रदेश व तेलंगना राज्याचा समावेश होतो . लोकमान्यसाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे ऑल इंडिया कापरिट एजन्सी न्यू बिझनेसमध्ये संपूर्ण भारतात लोकमान्य सोसायटीचा सहावा क्रमांक आहे .
यावेळी बोलताना लोकमान्यच्या संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी एलआयसीचे आभार मानून भविष्यातही चांगल्या व्यवसायाची ग्वाही दिली . या करारपत्रावर एलआयसीचे मार्केटींग व्यवस्थापक वाय . एम . मुराळ व लोकमान्यचे सीईओ अभिजित दिक्षित यांनीही स्वाक्षऱ्या केल्या . यावेळी प्रितम बिजलानी , लोकमान्य समुहातील व एलआयसीचे अधिकारी उपस्थित होते .