राज्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली असून सलग सहाव्या दिवशी काल गुरुवारी 1400 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षीच्या 25 डिसेंबर नंतर राज्यात पहिल्यांदाच एका दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.
दरम्यान काल गुरुवारी राज्यभरात एकूण 1488 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले असून 4 बाधितांच्या मृत्यू झाला आहे.
राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी राज्यात 341 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. कर्नाटकातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 11,363 वर पोचली असून आतापर्यंत एकूण 12,411 जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना भाविकांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचप्रमाणे बेंगलोर जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक 925 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली, तर 140 जण कोरोनावर मात करून हॉस्पिटलमधून घरी परतले आहेत. आतापर्यंत बेंगलोर जिल्ह्यात 4537 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.