राज्यात पुन्हा उचललं खाल्लेल्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना काल शुक्रवारी रात्री 11:59 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 2,886 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे वेगाने 1 कोटी रुग्ण संख्येच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कर्नाटकात सध्या कोरोना बाधितांची एकूण संख्या 9 लाख 83 हजार 930 इतकी झाली आहे.
कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात 1179 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 9,50,167 इतकी झाली आहे.
काल शुक्रवार दि. 26 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 2,886 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 9,83,930 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 21,252 ॲक्टिव्ह अर्थात सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 196 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
राज्यभरात नव्याने 8 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 12,471 झाली आहे. राज्यात हवाईमार्गे आलेल्या 3 लाख 29 हजार 913 प्रवाशांचे आतापर्यंत स्क्रिनिंग झाले आहे. दरम्यान, गेल्या 25 नोव्हेंबर 2020 पासून आत्तापर्यंत ब्रिटनहून 15,528 प्रवासी राज्यात आले आहेत.