बेेेळगाव शहरातील प्रमुख व्यापारी मार्गांपैकी एक असणाऱ्या कडोलकर गल्लीतील पथदीप बंद असल्यासंदर्भात “बेळगाव लाईव्ह’ वर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी घेऊन वृत्त प्रकाशित झालेल्या अवघ्या तासाभरात कडोलकर गल्लीतील पथदीप पूर्ववत सुरु झाले आहेत.
कडोलकर गल्ली येथील पथदीप बंद पडल्याने या परिसरात अंधार पसरला होता. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कडोलकर गल्लीत डेकोरेटिव्ह स्ट्रीट लाईट्स (पथदीप) बसवण्यात आले होते. परंतु गेल्या १० ते १५ दिवसांपासून हे पथदीप बंद अवस्थेत होते.
गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू असून यामुळे या परिसरात अंधार पसरला आणि पर्यायाने येथील व्यवसायांवर परिणाम दिसून आले. हे पथदीप जाणीवपूर्वक बंद करण्यात आल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर शहानिशा करण्यात आली. मुख्य वीजपुरवठा केंद्राकडून वीजपुरवठा झाला नाही तर पथदीप बंद पडणे शक्य आहे. याला कोणाचीही हरकत नसेल. परंतु काहीठिकाणी जाणीवपूर्वक हे पथदीप बंद होत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले.
याठिकाणी असलेल्या मीटर आणि फ्युज बॉक्समधील ठराविक फ्युजच काढून टाकल्याचेही निदर्शनास आले. हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी आणि हि बाब हेस्कॉम तसेच स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ‘बेळगाव लाईव्ह’ने सदर वृत्त प्रकाशित केले.
वृत्त प्रसारित झालेल्या अवघ्या तासाभरातच कडोलकर गल्ली पुन्हा एकदा प्रकाशमान झाली. या गोष्टीमुळे ‘बेळगाव लाईव्ह’ चे स्थानिकांनी आभार मानले आहेत.
कडोलकर गल्लीतील “हा” प्रकार जाणून बुजून तर होत नाही ना?
अभिनंदन
गोवावेस सर्कल ते धर्मवीर संभाजी चौक दरम्यान पथदिपाबद्दल आवाज उठवावा