शुक्रवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा गटाने बेळगावमध्ये धुडघूस घातला. रामलिंग खिंड गल्ली येथील शिवसेना कार्यालयासमोरील शिवसेना रुग्णवाहिका आणि काकती येथील हॉटेल गावकरीला देखील लक्ष्य केले. या हॉटेलला आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने भेट देऊन कर्मचाऱ्यांना धीर दिला.
जिल्हाप्रमुख दीपक गुडगनट्टी यांच्यासह करवेचे अनेक कार्यकर्ते या प्रकारात सामील होते. हा प्रकार पोलिसांच्या सहमतीने घडवून आणण्यात आला, हे पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेतून स्पष्ट होते.
करवेच्या या साऱ्या धिंगाण्यानंतर बेळगावमध्ये कन्नड – मराठी संघर्ष उसळला असून बेळगावमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळ असलेल्या काकती गावातील हॉटेल गावकरी येथेही या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला. हॉटेलच्या फलकांची मोडतोड करण्यात आली.
या फलकावर काळे फासण्यात आले. या साऱ्या प्रकारानंतर युवा समितीने घटनेसंदर्भात विचारपूस करण्यासाठी तसेच हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांना धीर देण्यासाठी हॉटेलला भेट दिली आणि साऱ्यांना धीर दिला.