रामदुर्ग तालुक्यातील होसकेरी चेकपोस्ट येथे सोमवारी रात्री एका कारगाडीतील 6 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
निवडणूक आचारसंहितेसाठी कार्यरत एसएसटी पथकाने ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेली रक्कम केंभावी गावातील एका व्यक्तीशी संबंधित असल्याचे समजते.
याप्रकरणी गुन्हा नोंदवून रोख रक्कम आणि हे प्रकरण जिल्हा पंचायत सीईओ यांच्या अध्यक्षतेखालील जप्ती आणि परिहार समितीकडे वर्ग करण्यात आले आहे.
सदर समिती या प्रकरणाची चौकशी करून जप्त केलेली रक्कम कोणाचे आहे? आणि कोणत्या कामासाठी ती वापरली जाणार होती? याची चौकशी करेल. तसेच या रकमेचा निवडणुकीशी संबंध नसेल तर ती ज्याची आहे त्याला परत केली जाणार आहे.