लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शहरातील मतमोजणी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी आरपीडी महाविद्यालयासह इतर इमारतींची पाहणी केली.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी कक्षाच्या निर्मितीसाठी विविध खोल्यांची तपासणी करण्यात आली. याठिकाणी गरज असलेल्या पायाभूत सुविधांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मतमोजणीपर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि दररोज कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याचो दखल घेऊन व्यवस्था करण्यात येईल. स्ट्रॉंग रूम परिसरात बॅरिकेड्स लावण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
निवडणूक काळात या सर्व व्यवस्था उत्तमरीत्या करण्यात येणार असून सुरक्षा व्यवस्था, पार्किंग आणि इतर समस्यांचादेखील आढावा या पाहणीवेळी घेण्यात आला आहे, अशी माहिती अभियंता संजीवकुमार हुलकाई यांनी दिली.
यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, डीसीपी डॉ. विक्रम आमटे , अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, उपविभागीय अधिकारी अशोक तेली , अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसंचालक चन्नबसप्पा कोडली , महानगर पालिकेचे आयुक्त जगदीश के. एच. , जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबुर , तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.