बेळगाव महा पलिकेसमोर लावण्यात आलेला लाल पिवळा ध्वज हटवा अशी मागणी करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी 8 रोजी या मोर्चाचे आयोजन केले असून सरदार मैदानापासून डी सी ऑफिस पर्यन्त हा मोर्चा काढला जाणार आहे.
सदर मोर्चा स्थगित करावा अशी मागणी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी आयोजकांकडे केली आहे अशी माहिती प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकात दिली आहे.
मनपा समोरील ध्वजा बाबत शनिवारी मराठा समाज आणि एम ई एस नेत्यां सोबत चर्चा झाली आहे त्यावेळी जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी आपण समिती नेत्यांना विनंती केली असल्याचे म्हटले आहे.कन्नड संघटना आणि त्यांच्या नेत्यां सोबत चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात प्रयत्न सुरू आहेत यासाठी सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चा स्थगित करा असे आवाहन जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी केलं आहे.
मार्केट ए सी पी कार्यालयात बैठक
दरम्यान समिती नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक ए सी पी कार्यालयात झाली असून पोलिसांनी देखील मोर्चा तात्पुरता स्थगित करा अशी विनंती समिती नेत्यांना केली आहे.कोणत्याही परिस्थितीत सरदार मैदान ते डी सी ऑफिस पर्यन्त मोर्चा काढला जाईल अशी भूमिका समिती नेतृत्वाने घेतली आहे.