बेळगाव जिल्ह्यात कोविड १९ नियंत्रण मार्गसूची आणि पोटनिवडणुका आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, संघ -संस्थांनी कोविड मार्गसूची आणि निवडणूक आचारसंहितेचे पालन करावे. कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यापूर्वी पूर्वपरवानगी घ्यावी, कोविड नियंत्रणासाठी सरकारी मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. के. हरीश यांनी बजावले आहेत.
महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचप्रमाणे राज्यातदेखील कोविड रुग्णांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. यासाठी सरकारने नवी मार्गसूची जाहीर केली आहे.
एकाचवेळी बंदिस्त भागात १०० आणि मोकळ्या जागेत ५०० जणांना मर्यादित प्रवेश देण्यात येणार आहे. याचप्रमाणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १६ मार्चपासून आचारसंहितादेखील लागू करण्यात आली आहे.
जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या निर्णयाचे पालन करंबे. तसेच जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन डॉ. के. हरिशकुमार यांनी केले आहे.
एकाचवेळी निवडणूक आचारसंहिता आणि कोविड नियमांचे उल्लन्घन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. के. हरीश कुमार यांनी दिला आहे.