Saturday, December 21, 2024

/

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक : जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष

 belgaum

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष तयार करण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी तसेच त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी लागू असलेल्या करण्यात येणार आहे.

जमावबंदी लागू असलेल्या ठिकाणी 5 पेक्षा अधिक जण किंवा मिरवणूक, सभा आयोजित करण्यास निर्बंध असणार आहेत. जमाबंदी परिसरात शस्त्रे, लाठ्या – काठ्या, चाकू, तलवार, बंदूक अशा मानवी जीवनास अपायकारक ठरणाऱ्या वस्तू घेऊन जाण्यास निर्बंध असणार आहेत. त्याप्रमाणे दगड व स्फोटक वस्तू घेऊन जाण्यास देखील निर्बंध असणार आहेत. विजयोत्सव, सार्वजनिक सभा राजकीय सभा, सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास मुभा नाही.

कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक भाषण घोषणाबाजीकरून कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या नियमातून अंत्यविधी आणि धार्मिक मिरवणुकीला वगळण्यात आले आहे. धार्मिक मिरवणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही, तसेच कायदा सुव्यवस्थेला धक्का पोहोचणार नाही. याची काळजी घेणे जरुरीचे आहे.

जर आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांनी दिला आहे. बंदिस्त सभेसाठी कमाल 100 आणि जाहीर सभेसाठी 500 पेक्षा अधिक लोक असता कामा नये. याचे राजकीय पक्षांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

पोटनिवडणुकीसाठी एकूण 2566 बूथ, 2566 बूथवर एकूण 11,290 कर्मचारी, सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांनाी 20 हजार रुपये आणि अनुसूचित जाती वर्गातील उमेदवारांना 12 हजार 500 रुपये अनामत रक्‍कम भरावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी 77 लाख रुपयांची खर्चाची मर्यादा निश्‍चित केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रे लवकरच निश्‍चित करण्यात येणार आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोघांनाच प्रवेश असून, शक्तिप्रदर्शन आणि मिरवणुकीने अर्ज भरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बेळगाव शहर पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरात 100 मीटर अंतरापर्यंत मंगळवारपासून (23 मार्च) 4 मे च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत कलम 144 नुसार जमावबंदीचा आदेश अतिरिक्त न्यायदंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी बजावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.