बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे आज दुपारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांच्या पत्नी श्रीमती मंगला अंगडी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
आज दुपारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांच्या पत्नी श्रीमती मंगला अंगडी यांनी भारतीय जनता पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करतेवेळी मंत्री गोविंद कारजोळ आणि के एस ईश्वराप्पा,केंद्रीय मंत्री प्रहलाद जोशी आदी उपस्थित होते.
अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी आहे.अनेक अपक्ष उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहेत.