कोरोना काळात तब्बल पाच ते सहा महिने कोणत्याच उत्पन्न नसणाऱ्या आरटीओ कार्यालयाला आता या महिन्यात आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.
मार्च अखेर असल्याने या महिन्यात तब्बल दोन महिन्याचे काम करून आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरटीओ कार्यालयातील अधिकारी धडपडत आहेत. त्यामुळे याकडे आता कशाप्रकारे आरटीओ अधिकारी आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
बेळगाव शहर आणि खानापूर तालुका हे आरटीओच्या अखत्यारीत येते. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना आरटीओ शिवानंद मगदूम यांनी सूचना केल्या आहेत. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात आरटीओ कार्यालयाने फटका बसला आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांना उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठे कष्ट उपसावे लागणार आहेत. तब्बल पाच ते सहा महिने आरटीओ कार्यालयात कोणतीच कामे न झाल्याने समस्या निर्माण झाली होती.
दरम्यान याकडे आरटीओ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन इतर महिन्यातील कामे दुपटीने तर इतर वसुलीही मोठ्या प्रमाणात केली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात हेल्मेट सक्ती व इतर कारवाई करून आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत.
आता या वर्षीचा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्च महिन्यात दोन महिन्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपली धडपड सुरू केली आहे. हे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही याकडेही अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.