कर्नाटक रोलर स्केटिंग संघटनेतर्फे आयोजित 36 व्या राज्य रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा 2020 -21 मध्ये बेळगाव जिल्ह्याच्या स्केटिंगपटुंनी 9 सुवर्णपदकांसह एकूण 29 पदके हस्तगत करण्याद्वारे चमकदार कामगिरी नोंदविली आहे.
उन्नतीनगर म्हैसूर येथे गेल्या 4 ते 7 मार्च 2021 या कालावधीत 36 व्या राज्य रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील जवळपास 450 स्केटर्सनी भाग घेतला होता. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्याच्या स्केटिंगपटुंनी 9 सुवर्णपदके, 5 रौप्य पदके आणि 15 कांस्य पदके अशी एकूण 29 पदकांची कमाई केली. बेळगावच्या स्केटिंगपटुंनी मिळवलेले यश खालीलप्रमाणे आहे.
अविनाश कामण्णावर (7 -9 वर्षे मुले) एक सुवर्ण पदक, एक कांस्य पदक. आराध्या पी. (5 -7 वर्षे मुली) दोन सुवर्ण पदकं. तन्वी मोहिते (7 -9 वर्ष मुली) दोन रौप्य पदकं. मनिषकुमार चौधरी (14 -17 वर्षे मुले) एक कांस्य पदक. अनुष्का शंकरगौडा (17 वर्षावरील मुली) एक सुवर्ण पदक, 1 रौप्य पदक, दोन कास्यपदकं.
आदित्य बाळीकाई (14 -17 वर्षे मुले) 1 सुवर्णपदक. भक्ती हिंडलेकर (17 वर्षावरील मुली) तीन कांस्यपदकं. सौम्या कामटे (14 -17 वर्षे मुली) 1 कांस्यपदक. श्रीपाद जाधव (17 वर्षावरील मुले) 1 सुवर्ण पदक, 1 रौप्य पदक, 1 कांस्यपदक. श्रीधर जाधव (17 वर्षावरील मुले) 1 कांस्यपदक. यशवर्धन परदेशी (11 -14 वर्षे मुले) 3 कांस्यपदकं. फ्रीस्टाइल : अविनाश नवले 1 रौप्यपदक, प्रीती नवले 1 सुवर्णपदक. इनलाईन हॉकी : मंजुनाथ मंडोळकर 1 सुवर्णपदक, यशपाल पुरोहित 1 सुवर्णपदक.
हे सर्व यशस्वी स्केटिंगपटु गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक आणि केएलई सोसायटीच्या स्केटिंग रिंकवर सराव करतात. त्यांना त्यांच्या पालकांसह डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाडगे, राज घाडगे, राज्य संघटनेचे सरचिटणीस पी. के. भरतकुमार, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष उमेश कलघटगी आदींचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलेकर, प्रसाद तेंडुलकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर आणि विठ्ठल गाणगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.