रॉस्ट्रम डायरीजतर्फे भव्य ऑनलाइन काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या या महोत्सवात काव्य लेखकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर काव्य महोत्सव संपूर्णपणे ऑनलाईन उपक्रम असून देशातील ख्यातनाम लेखक हे या महोत्सवाचे परीक्षक असणार आहेत. विविध श्रेणी आणि भाषा आधारित पुरस्कार तसेच 50 हजार रुपयापर्यंतची बक्षिसे या काव्य महोत्सवासाठी पुरस्कृत करण्यात आले आहेत.
याव्यतिरिक्त सहभागी सर्वांना प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. सदर महोत्सवासाठी इंग्रजी, हिंदी, मराठी आणि कन्नड भाषेत कविता स्वीकारल्या जातील. कविता कोणत्याही विषयावर मात्र 500 पेक्षा अधिक शब्दांची नसावी.
महोत्सवात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी नांव नोंदणीसाठी www.belagavipoetryfestival.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. सदर नांव नोंदणी जगभरातील सर्व वयोगटातील सर्वांसाठी खुली आहे. नांव नोंदणीची अंतिम तारीख 16 मे 2021 ही आहे. महोत्सवाच्या नियमांसंदर्भात इच्छुकांनी www.belagavipoetryfestival.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी 9986186781 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
इच्छुक https://belagavipoetryfestival.com/chat या लिंकवर क्लिक करून व्हाट्सअपच्या माध्यमातून आमच्याशी चॅट देखील करू शकतात, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. डॉ. सरनोबत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, बियाँड गॅरेज, ग्रीन अर्थ बायो फ्युअल, ऑल अबाऊट बेळगाव, डीबीटी, पोग टू टोग, बीएसएन, मेक इन बेळगाव, एक्सकोगीटेट प्रॉडक्शन आणि बॉम्बे वडापाव यांच्या सहकार्याने या ऑनलाईन काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.