महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे येत्या 16 मार्च 2021 पासून सुरू होणारी बेळगाव ते नागपूर विमान सेवा लांबणीवर पडली असून ती आता एक महिना उशिरा सुरू होणार आहे.
स्टार एअर विमान कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे नुकतीच ही माहिती जाहीर केली आहे. स्टार एअरने बेळगाव व महाराष्ट्राच्या राजधानीला जोडण्यासाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडेच सुरू केलेल्या नाशिक व जोधपूर या विमानसेवांना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे कार्गो हब म्हणून उदयाला येणाऱ्या नागपूर शहराला विमान सुरू करण्यात येणार होती. पश्चिम महाराष्ट्र, कोंकण व उत्तर कर्नाटकातून पहिल्यांदाच या शहराला विमानसेवा सुरू होत असल्याने या विषयी प्रवाशांना उत्सुकता लागली होती.
मात्र आता महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे बेळगाव -नागपूर विमान सेवा 16 मार्च रोजी एक महिना उशिरा सुरू होणार आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह चांचणी बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळेच स्टार एअरने तूर्तास ही नवीन विमानसेवा रद्द करून 15 एप्रिलपासून ती सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नागपूरला प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना आता 15 एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे. ज्या प्रवाशांनी विमानाचे बुकिंग केले आहे. अशांना त्यांचे बुकिंग रिफंड केले जाईल असेही कंपनीतर्फे कळविण्यात आले आहेत.