गेले 24 तास बेळगाव जिल्ह्यात नव्याने 16 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 27,223 झाली असून आतापर्यंत 5,61,886 जणांचे स्वॅबचे नमुने गोळा करण्यात आले आहेत.
बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज मंगळवार दि. 23 मार्च 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 5,62,978 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 23,543 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 187 आहे.
काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 25,024 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 5,14,224 आहे.
कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 5,61,886 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 27,223 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज मंगळवारी नव्याने आढळलेल्या 16 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 5,29,350 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 187 आहेत. त्याचप्रमाणे 2,294 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 342 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 26,694 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज मंगळवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील 6 गोकाक 3, खानापूर व हुक्केरी तालुक्यातील प्रत्येकी 2, अथणी व चिक्कोडी तालुक्यातील प्रत्येकी 1 आणि इतर 1 अशा एकुण 16 रुग्णांचा समावेश आहे.