आठवड्याचा पहिला दिवस आणि बँकांचा देशव्यापी संप या परिस्थितीचा फटका आज कर्नाटक राज्य आणि पर्यायाने बेळगाव जिल्ह्याला बसणार आहे. आर्थिक व्यवहार बंद राहिल्याने सुरुवातीलाच मोठी खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या संघटनेने हा बंद पुकारला आहे. राज्याच्या अखत्यारीतील दोन महत्त्वाच्या बँकांच्या खासगीकरण प्रक्रियेला विरोध करण्यासाठी हा बंद होणार आहे.
विशेषतः देश पातळीवर बँकांचे व्यवहार बंद राहणार असल्याने उद्योग, व्यापार यांचे तर कंबरडे मोडणारच आहे तसेच सामान्य माणसाचे व्यवहारही खोळंबून राहणार आहेत.
सध्या परीक्षा तोंडावर आहेत. अनेक परीक्षांची फी भरण्याची कामे सुरू आहेत, या पार्श्वभूमीवर बँकांचा बंद लवकरात लवकर मिटण्याच्या बाबतीत सरकारने पावले उचलण्याची गरज आहे.