राज्यातील मुख्य बाजारपेठ असणारी एपीएमसी येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या साहित्याची खरेदी विक्री होते. त्यामुळे दररोज येथे हजारो लोक ये-जा करत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी नवीन भाजी मार्केट सुरू करण्यात आल्याने यामध्ये वाढ झाली आहे. मात्र या ठिकाणी असणारे नेम्मदी केंद्र कुचकामी ठरत आहे.
वीज बिल न भरल्याने हे केंद्र बंद करण्यात आले आहे. याबाबत वारंवार तहसीलदारांकडे तक्रारी करण्यात आले आहेत. मात्र त्यांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून आणि नागरिकातून एकच संताप व्यक्त होत आहे. एपीएमसी येथे असणाऱ्या नेंमदी केंद्रावर नागरिकांची मोठी वर्दळ असते.
मात्र मागील महिन्याभरापासून हे केंद्र बंद पडल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि याला कारण केवळ वीज बिल न भरल्याने हे केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. उतारा व इतर कामांसाठी शेतकरी आणि नागरिक या ठिकाणी येत असतात. मात्र येथील केंद्र बंद ठेवण्यात आल्याने एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. सरकारकडे आता नेंमदी केंद्राचे वीज बिल भरण्यासाठी पैसे नाहीत का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील नेंमदी केंद्र सुरळीत सुरू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. बेळगाव शहर आणि परिसरात असणाऱ्याने नेमंदी केंद्रावर वारंवार गर्दी दिसून येते तर जुने तहसीलदार येथे असणाऱ्या ठिकाणी तर नागरिकांच्या झुंबड उडते.
मात्र वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या केंद्रांपैकी एपीएमसी येथे उघडण्यात आलेल्या केंद्र बंद झाल्याने मोठी हेळसांड होऊ लागली आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे केंद्र सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.