बेळगावातील भाजप नेते आणि कर्नाटक सरकारचे नवी दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांना अमेरिकन युनिव्हर्सिटी फोर ग्लोबल पीस या विद्यापीठातर्फे ‘डॉक्टर ऑफ ह्युमॅनिटी’ ही पदवी आणि ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सीलन्स’ प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
दि अमेरिकन युनिव्हर्सिटीतर्फे कर्नाटक सरकारचे नवी दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांना डॉक्टर ऑफ ह्युमॅनिटी ही पदवी दिली आहे. सदर विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या 120 देशांच्या गव्हर्नरच्या मान्यतेने त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली आहे.
त्यांना ही पदवी देत असल्याचे सदर विद्यापीठाने 17 मार्च 2021 रोजी कळवले आहे. त्याचप्रमाणे द अमेरिकन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस -युएसए विद्यापीठाने
द युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस -युएसए यांच्या सहकार्याने गेल्या 18 मार्च 2019 रोजी आयोजित केलेल्या ‘ग्लोबल पीस फॉर मेकिंग इंडिया सस्टेनेबल डेव्हलप्ड अँड स्ट्रॉंग’ या विषयावरील चर्चासत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल शंकरगौडा पाटील यांना ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ हे प्रशस्तीपत्र देखील प्रदान करण्यात आले आहे. सदर यशाबद्दल शंकरगौडा पाटील यांचे राजकीय क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
https://www.instagram.com/p/CMzQ7meBkIL/?igshid=1jezvs0o52imj