लोकसभा पोटनिवडणुकीच्या तारीख उद्या बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने सर्वप्रकारची तयारी केली असून तारीख जाहीर करणे बाकी आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची प्रत्येक राजकीय पक्ष आतुरतेने वाट पहात असून या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची नावे देखील जाहीर होणार आहेत.
बुधवारी सकाळी 11 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली असून यावेळी पश्चिम बंगाल केरळ आणि तमिळनाडुच्या विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे त्याच निवडणुका बरोबर पहिल्या टप्प्यात बेळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची पोट निवडणूक देखील जाहीर होऊ शकते.
बेळगाव पोट निवडणुकी साठी भाजप आणि काँग्रेस दोघांनीही अद्याप उमेदवार ठरवला नसून इच्छुकांनी मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या असून सर्वचजण निवडणूक आयोगाच्या आदेशाची आतुरतेने वाट पहात आहेत. मागील आठवड्यापासून बेळगाव लोकसभेसह मस्की आणि बसवकल्याण विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या तारीख जाहीर होण्याची वाट सर्वच राजकीय पक्ष पहात असून आता निवडणूक आयोगाचीही निवडणुकीसंदर्भातील सर्व तयारी झाली आहे.
बुधवारी सकाळी बेळगाव लोकसभेची तारीख जाहीर होण्याची दाट शक्यता असून निवडणूक आचारसंहिताही जाहीर त्याचवेळी जाहीर होईल. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे बेळगाव जिल्ह्याचे रहिवासी असल्याकारणाने निवडणूक संपेपर्यंत त्यांची दुसऱ्या जिल्ह्यात तत्कालीन काळासाठी बदली करण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.