Friday, November 15, 2024

/

सौंदर्य क्षेत्रात बेळगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारी सौंदर्यवती!

 belgaum

अनेकविध क्षेत्रात आज महिला यशोशिखर गाठत आहेत. असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपला ठसा उमटविला नाही. साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, सैन्यदल इतकेच नाही तर अवकाशातदेखील आज तितक्याच ताकदीने महिला झेपावत आहेत. त्यातूनही सौंदर्य क्षेत्र म्हणजे महिलांचे अधिराज्य असणारे क्षेत्र! अशा क्षेत्रात आपल्यासह आपल्या बेळगावचे नाव देशपातळीवर पोहोचवणारी सौंदर्यवती म्हणजे रती हुलजी.

बेळगावचे नाव अनेक तरुणींनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. अनेक क्षेत्रांसह आज सौंदर्यक्षेत्राचीही यात भर पडली आहे. नुकत्याच झालेल्या ‘व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया या मानाच्या सौंदर्यवती स्पर्धेत कर्नाटकाचे प्रतिनिधीत्व करणारी सौंदर्यवती रती हुलजी ही ‘टॉप फाईव्ह फायनॅलिस्ट’मध्ये निवडली गेली… तिच्या आजवरच्या यशाच्या प्रवासाबद्दल ‘बेळगाव लाईव्ह’ ने केलेली बातचीत…

भारतातील राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणारी फेमिना मिस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा मुंबई येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत टॉप फाईव्ह फायनलिस्टमध्ये कर्नाटकाचे प्रतिनिधीत्व करत बेळगावच्या रती हुलजी या युवतीने बहुमान पटकाविला. मिस इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धेच्या पूर्ण प्रक्रियेला डिजीटल रुपात आयोजित करण्यात आलं होतं. कोणत्याही प्रशिक्षणाविना आपल्या जिद्दीच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर बहुमान पटकाविण्यात रती हुलजी या युवतीला यश मिळालं आहे. आपल्या यशाचे श्रेय हे संपूर्णपणे आपल्या जिद्दीला, प्रयत्नांना आणि यासोबतच आपल्या कुटुंबाने दिलेल्या सहकार्याला जातं, असे मत रती हुलजीने ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना व्यक्त केले.Rati hulji

मूळचे तुडये गावातील हुलजी कुटुंबीय, रतीचे आजोबा कै. खाचोजी हुलजी हे एअर इंडिया मध्ये कार्यरत होते. वडील शरद हुलजी हे मुंबई येथे मायक्रोसॉफ्ट कंपनीत सेवा बजावितात. जन्म बेळगावचा परंतु वडिलांच्या व्यवसायामुळे सध्या मुंबईस्थित असलेल्या रतीचे शिक्षण हे सांताक्रूझ मुंबई येथील आर्य विद्या मंदिर येथे झाले आहे.

लहानपणापासूनच मॉडेलिंग क्षेत्रात करियर बनविण्याचे स्वप्न असलेल्या रतीने आपल्या स्वप्नावर लक्ष केंद्रित करत फेमिना मिस इंडियाचा टप्पा गाठला. २०१४ साली मॉडेलिंग क्षेत्रात आपल्या करियरची सुरुवात केलेल्या रतीने क्लीन अँड क्लियर मुंबई टाइम्स फ्रेश फेस कॉन्टेस्टमध्ये सेकंड रनरअपचा बहुमान पटकाविला आहे.

तसेच पुणे फॅशन वीक, विक्रम फडणीस, होरा लक्झरी अशा इव्हेंटमध्ये रॅम्पवॉक केला आहे. लॅक्मे, पॅन्टलून्स, क्राफ्ट्स विला, मॅककॅफिने, मेबाज, वेडिंग सुत्रा, विवो, मारुती सुझुकी, वोटिंग ऍड्स, अस्त्र अशा अनेक जाहिरातीमध्ये देखील झळकली आहे. स्प्राईट कंपनीसाठी रतीने एका जाहिरातीचे शुटिंगदेखील नुकतेच पूर्ण केले असून लवकरच ही जाहिरात प्रकाशित होणार आहे. व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया (कर्नाटक) हा बहुमान पटकाविल्यानंतर ‘मिस युनिव्हर्स’ या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊन मानाचे मुकुट जिंकण्याची प्रबळ इच्छा असल्याचे तिने बोलून दाखविले.Rati hulji

प्रत्येकाचे सौंदर्य हे केवळ बाह्यरुपावर अवलंबून नसून अंतररूपावर अधिक अवलंबून असते. प्रत्येकजण अद्वितीय आणि सुंदर आहे. सध्याच्या ‘झिरो फिगर’ जमान्यात ‘फिट आणि फॅट’ याची सांगड घालताना आपण तंदुरुस्त राहण्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे आजच्या तरुण पिढीला रती सांगते.

‘फिट आणि फॅट’ यापेक्षा तंदुरुस्त आणि निरोगी राहा, योग्य वेळी, योग्य आणि सकस सेवन करा, आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्टीला सामोरे जा, कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका, आपली स्वप्न जपा, ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी, कठोर परिश्रमाने ती स्वप्ने सत्यात उतरवा, असा सल्ला तिने आजच्या तरुण पिढीला दिला आहे. रतीने मिळविलेल्या यशाबद्दल आणि इथून पुढच्या तिच्या प्रवासाबद्दल ‘बेळगाव लाईव्ह’ तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा!

– वसुधा कानूरकर – सांबरेकर, बेळगाव

देशातील पाच सौन्दर्यवती पैकी एक असलेली बेळगावची सौन्दर्यवती युवती -व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया कर्नाटक स्पर्धेतील टॉप फाईव्हची स्पर्धक… मॉडेल ते सौन्दर्यवती बनण्याचा तिचा प्रवास कसा होता?… याबद्दल जाणून घेऊयात…

व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया कर्नाटक, रती हुलजीची.. एक्सक्लुसिव्ह मुलाखात.. पहा फक्त बेळगाव live वर!
#ratihulji
#vlcfeminamissindia
#belgaumgirlratihulji
#livebelgaum
#VLCCFeminaMissIndiaKarnataka
https://www.facebook.com/375504746140458/posts/1330888563935400/

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.